Sunday, 18 January 2015

उंटाची गोष्ट

खुप दिवसांनी पुन्हा लिहितो आहे. फार कही नविन नाही घेऊन आलो पण एक गोष्ट वाचली व्हाट्सएप वर. छान माध्यम आहे व्हाट्सएप, योग्य वापर केल्यास छान फायदे होउ शकतात त्याचे.

तीच गोष्ट आणि माला समजलेले परिस्थिति सापेक्ष दोन वेगवेगळे अर्थ मी सांगणार आहे. गोष्ट आशी आहे:

एक मोठा व्यापारी होता त्याच्याकडे शंभर ऊंट होते. उंटांची राखण करायसाठी त्या व्यापाऱ्याने एक रखवालदार नोकरीवर ठेवला होता.

एक दिवस तो राखवालदार नोकरी सोडून जातो. एक नविन माणूस ती नोकरी मागायला येतो. व्यापारी त्याला एकच अट घलतो, "तू तेव्हाच झोपयचस जेव्हा सगळे ऊंट झोपतिल! "अट तशी साधी होती, पगरहि बरा होता त्यामुळे नकारचा प्रश्नच नव्हता. नोकरी मिळाली!

आणि पहिल्याच आठवड्यात खरी गड़बड़ राखवालदाराच्या लक्षात आली. पूर्ण आठवड्यात एकदाहि सगळे ऊंट एकच वेळेस झोपले नाही! आणि आटिप्रमाने राखवालदारहि पूर्ण आठवडा झोपु शकला नाही!

पुढचा आठवडाभर आपला हीरो वेगवेगळे उपाय करुन पाहतो, एका दिवशी 99 ऊंट झोपतात आणि शेवटचा ऊंट पण पेंगत असतो! राखवालदार खुश होतो. त्याला वाटतं आज आपल्याला झोपायला मिळणार! शेवटचा ऊंट लवकर झोपवा म्हणून राखवालदार त्याला मीठी मारून गाणं गाऊ लागतो, पण होतं भलतच!

ह्याच्या गण्याने दचकुन् ऊंट जोरात ओरडतो आणि बाकी ऊंट पण जागे होतात!

शेवटचा उपाय म्हणून नविन रखवालदार जुन्या राखवालदारचा सल्ला घ्यायला गेला. जूना राखवालदार म्हणाला मलाही व्यापाऱ्याने आशीच् अट घातली होती. पण मी माझी वेळ झाली की झोपत होतो...

ह्या गोष्टीच्या पुढे तात्पर्य होतं की आयुष्यात पण असे खुप ऊंट असतात आणि आपण त्या उंटांच्या झोपायची वाट पहात राहतो आणि आपलं स्वास्थ्य हरवून बसतो जसं की मी एवढं कर्ज फेडलं की आमुक करेन तमुक झाल्यानंतर ढमुक करेन आणि आश्या गाजरांच्या पाठीमागे धावता धावता जगायचं विसरून जातो.

ही होती गोष्ट आणि तात्पर्य संक्षिप्त रुपात. ज्या वेळी मी ही गोष्ट वाचली तेव्हा माला आयुष्याच्या ह्या पैलू ची ओळख व्हायची खरच गरज होती, पण पुढे काही अशा घटना घडल्या की मझ्यासमोर ह्याच कथेचा अजुन एक पैलू आला.

आत्तापर्यंत तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट झाल्या आसतील की ऊंट म्हणजे अडचणी आणि झोप म्हणजे आनंद देणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी.

किंवा झोप म्हणजे तुमचं ध्येय किंवा स्वप्न आणि उंटांची झोप म्हणजे ऑब्लिगेशन्स. आणि तात्पर्य म्हणजे ऑब्लिगेशन्स हे हळू हळू पूर्ण करतालच तुम्ही पण जर झोप घेतली नाही तर तुम्ही लवकरच थकताल आणि तुमचा प्रवास आर्ध्यातच संपेल!

पण आयुष्यात ही फिलॉसॉफी वपरताना एक सगळ्यात मोठी पण सगळ्यात बेसिक गोष्ट आपण नजरअंदाज करतो ती म्हणजे आपण नक्की ओळखतो का आपले ऊंट कोणते आणि आपली झोप कोणती...

No comments:

Post a Comment